Header Ads

ad

विजय माल्ल्याला न्यायालयाचा आणखी एक दणका


मुंबई, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने विजय माल्ल्याला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी फरारी घोषित करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. या विनंतीवर स्थगिती आणण्याची मल्ल्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
आता विजय माल्ल्याला फरारी घोषित करण्याचा आणि त्याच्या संपत्तीवर टाच मार्ग मोकळा झाला आहे. कायद्याप्रमाणे एकदा गुन्हेगार फरारी घोषित झाला की कारवाई करणार्‍या यंत्रणेला त्याची संपत्ती जप्त करण्याचे पुर्ण अधिकार असतात. फरारी घोषित करण्यावर स्थगिती आणावी ही मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यावर मल्ल्याने उच्च न्य्यालयात धाव घेतली होती पण उच्च न्यायालयानेही स्थगिती देण्यास नकार दिला.
भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यस्र्राट विजय माल्ल्याला ईडीने दणका दिला होता. ईडीने माल्ल्याचे अलिबागमधले सुमारे 100 कोटी रूपयांचे फार्म हाऊस ताब्यात घेतले. मांडवा इथल्या समुद्र किनार्‍यालगत माल्ल्याचे सतरा एकरमध्ये आलिशान फार्महाऊस आहे.
ईडीच्या मुंबईतील पथकाने माल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस धाड टाकत ते जप्त केले. या मालमत्तेची किंमत ईडीने 25 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 100 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

No comments

Thank you for your feedback.