बँका तीन दिवस बंद, ऑॅनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन
मुंबई, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
देशभरातील बँका पुढचे सलग तीन दिवस बंद राहणार असून ग्राहकांनी ऑॅनलाईन व्यवहार करावेत, असे आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट झाल्यास ग्राहकांची गैरसोय होऊ शकते.
गुरुनानक जयंतीनिमित्त आज (शुक्रवार 23 नोव्हेंबर) बँकांना सुट्टी आहे. तर चौथ्या शनिवारमुळे उद्या (24 नोव्हेंबर) आणि रविवार (25 नोव्हेंबर) असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो. नागरिकांनी शक्यतो ऑॅनलाईन व्यवहार करावेत, असे आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (26 नोव्हेंबर) बँकांचे कामकाज सुरु होईल. मात्र ओव्हरलोडमुळे त्या दिवशीचे चेक क्लिअरिंगच्या कामास आणखी एखादा दिवस लागू शकतो, असेही बँकांनी स्पष्ट केले.

Post a Comment