Header Ads

ad

नांदेडमध्ये गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

नांदेड24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिख धर्मियांचे पहिले गुरू श्री गुरुनानकजी यांची 549 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सचखंड गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे 3 वाजता विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. नानकांच्या जयंतीनिमित्त सचखंड गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
गुरुनानक यांची 549 वी जयंती धार्मिक गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब येथे शुक्रवारी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त पहाटे 3 वाजेपासूनच भाविकांनी गुरुद्वारात दर्शन सुरू केले. पहाटे 4 वाजता श्री गुरु ग्रंथसाहीबचे पठण आणि हुकूमनामाचे वाचन करण्यात आले.
यावेळी जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, भाई काश्मीरसिंघजी, मीतग्रंथी भाई अवतार सिंघजी शीतल, धुपिया भाई जोगिंदरसिंघजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रसादाचे वितरण झाले. शुक्रवारी दिवसभर हजारोंच्या संख्येत सर्वधर्मीय भाविकांना गुरुद्वाराच्यावतीने प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी 10 हजारांपेक्षा जास्त भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरूनानक जयंतीच्या वेळी पेढ्याचा प्रसाद तयार करण्याची जुनी प्रथा आहे.
अनेक भाविक बिदरला रवाना
दरम्यान, बिदर (कर्नाटक) येथील नानकझिरा गुरुद्वारा येथे दरवर्षी गुरुनानकजी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. देश विदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी बिदर येथे जात असतात. सचखंड गुरुद्वाराच्या वतीने हजारो भविकांसह रेल्वे मार्गाने बिदर येथे चौकी काढली जाते. शनिवारीही अनेक भाविक बिदरला रवाना झाले.

No comments

Thank you for your feedback.