Header Ads

ad

दिल्लीत शेतकर्‍यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!

कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या 30 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये शेट्टींनी पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिल्लीतल्या संसद घेराव आंदोलनाबाबत चर्चा झाली. देशातल्या 22 पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आपली बांधिलकी शेतकर्‍यांशी आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमी भाव मिळत असेल तर आपण आघाडीत जाऊ असेही शेट्टी यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींची भेट घेतली आहे. पवारांचा हा दौरा खासगी असला तरी या दौर्‍यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकसंदर्भात बर्‍याच राजकीय घडामोडी होतील, असे चित्र आहे.

No comments

Thank you for your feedback.