काय सांगता! रिसेप्शनमध्ये दीपिकाने केला अनुष्काचा लूक कॉपी ? (मनोरंजन)
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नुकतेच बंगळूरुमध्ये लग्नाचे रिसेप्शन पार पडले. यावेळी दोघांचे कुटुंबातील नातेवाईक सहभागी झाले होते. या दांपम्त्याचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मात्र, दीपिकाने रिसेप्शनमधील अनुष्काचा लूक कॉपी केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
रिसेप्शनमध्ये दीपिका गोल्डन कलरची साडी आणि ग्रीन कलरच्या ज्वेलरीमध्ये दिसली. तर रणवीर ब्लॅक कलरच्या शेरवाणीत पाहायला मिळाला. दोघांचा लूक खूपच रॉयल होता. दीपिकाने परिधान केलेली साडी तिची आई उज्वला पदुकोण यांनी भेट दिली आहे.
दीपिकाने गोल्डन कांजीवरम सिल्क साडी नेसली आहे. याला रॉयल टच देण्यासाठी शाही मोत्यांचा हार तिने घातला. त्याचबरोबर भांगात कुंकू आणि घट्ट अंबाडा बांधला आहे. मात्र, सोशल मीडियावर या लूकची तुलना अनुष्काच्या लूकशी केली जात आहे.
अनुष्काच्या साडीचा रंग भलेही वेगळा असला तरी लूक पूर्णपणे कॉपी केल्याची चर्चा होतेय. तिने सुद्धा भांगात कुंकू, वजनदार ज्वेलरी आणि चूडा घातलेल्या लूकमध्ये बनारसी साडी नेसली होती.

Post a Comment