कोरेगाव भीमा प्रकरण; गौतम नवलखांची अटक टळली
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
कोरेगावा भीमा हिंसाचारप्रकरणी गौतम नवलखा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नवलखा यांची अटक सध्या टळली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे.
कोरेगांव भीमा हिंसा प्रकरण आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीासाठी गौतम नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आजच्या सुनावणी दरम्यान गुन्हा रद्द करण्याचा याचिकेला सरकारी वाकिलांनी जोरदार विरोध केला. या प्रकरणाची सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे नवलखांची अटक टळली आहे.
या प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. याबरोबरच या याचिकेवर येत्या 14 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत याचिकाकर्ते गौतम नवलखा यांना अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने दिले आहे.

Post a Comment