Header Ads

ad

मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींचा ‘ उलगुलान ‘ मोर्चा मुंबईत धडकला आहे. या पार्श्‍वभूमिवर एका पीडिताने अधिवेशन काळात मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. एका बिल्डरने फसवणूक केल्याचे या व्यक्तीचे म्हणणे आहे.
आदिवासी आणि शेतकर्‍यांचा मोर्चा आझाद मैदानात असल्याने, विधान भवन आणि मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कडक बंदोबस्तात नवी मुंबईचे रहिवासी संतोष मोहिते यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून घेतले. पोलिसांना हे दृश्य दिसताच पाच सहा पोलिसांनी मोहिते यांनी पकडले. त्यावेळी काय कामाचे आहे हे सरकार, गरीबांना न्याय देत नाही, असे उद्गार मोहिते यांच्या तोंडून निघाले.
नवी मुंबईतील एका बिल्डरने मोहिते यांना 18 लाखांना फसवले असल्याची त्यांची तक्रार होती. वारंवार मंत्रालयात खेटे मारूनही त्यांची नुकसान भरपाई होत नव्हती, त्यामुळे मोहिते नाराज असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. अधिवेशन काळात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मंत्रालय सुरक्षा पोलिसांनी कमालीची गुप्तता ठेवली असून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

No comments

Thank you for your feedback.