Header Ads

ad

साईबाबांच्या गुरुवारच्या पालखी सोहळ्यात होणार बदल

अहमदनगर,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
साईबाबांच्या मंदिरातील पालखी सोहळ्याला वादाचे गालबोट लागत आहे. त्यामुळे आज होणार्‍या पालखीवेळी होणार्‍या गर्दीच्या नियोजनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी मानकरी आणि ग्रामस्थांनाही आचारसंहीता पाळावी लागणार आहे.
साईंबाबांचे दर्शन मिळावे ही सर्वांचीच इच्छा असते, त्यात शिर्डीतील लोकांशी आणि मंदिर प्रशासनाशी ओळख केली तर आणखी सुलभ होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून या ओळखीतून दर्शना व्यतिरीक्त इतर कार्यक्रमातही भक्तांचा वावर वाढत चालला आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रमात व्यत्यय आणि त्यानंतर वादही उद्भवत आहेत. गेल्या गुरुवारी राहत्यातील एक प्रतिष्ठीत महिलेचा साईमंदीर प्रमुखांनी अपमान करत विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यातून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता साई संस्थान वतीने गुरुवारी होणार्‍या पालखी सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. याबरोबर कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साईमंदिराच्या धार्मिक कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता यावे. मात्र, यावेळी कोणाची तर ओळख सांगून अनेकजण दर्शन घेतात. यावेळी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन साई संस्थानकडून करण्यात आले आहे. त्यासोबत साई मंदीर ते द्वारकामाई पर्यंतच्या साई पादुकांच्या मिरवणुकीतील सहभागी होणार्‍या संख्येवरही आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

No comments

Thank you for your feedback.