जगातील पहिले इंडोस्पाईन सेंटर ऑॅफ एक्सलन्स ट्रेनिंग वसईमध्ये
वसई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
घडाळ्याच्या काट्यावर जगणार्या माणसांच्या जीवनशैलीत दिवसांगणिक होत असलेल्या अपायकारक बदलामुळे अनेकांना मणक्यांचे आजार उद्भवत आहेत. त्यानंतर यावर शस्त्रक्रियेविना पर्याय राहत नाही. मात्र, आता वसईत याच मणक्याच्या आजारावर एक अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि टाके विरहित इंडोस्कोपी शस्त्रक्रियेचे सेंटर लवकरच वसईत सुरू होत आहे. हे सेंटर जगातील पहिले ट्रेनिंग सेंटर असणार आहे.
डॉ. गोरे इंडोस्पाईन सेंटर ऑॅफ एक्सलन्स ट्रेनिंग सेंटर या नावाने वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात येत्या डिसेंबरमध्ये हे सेंटर सुरू होत असून येथे देश-विदेशीतून प्रशिक्षितांची पहिली बॅच याठिकाणी येत आहे. एकूणच मणक्याची अत्याधुनिक शस्त्रक्रिया, प्रशिक्षण सेंटर आणि मिशन स्पाईन संस्ंथाचे कार्य काय आहे, याची सविस्तर माहिती गोल्डन पार्क रुग्णालयाचे डॉ. माल्कम पेस्तनजी यांनी दिली. यावेळी डॉ. पेस्तनजी यांनी या टाके विरहित, आधुनिक शस्त्रक्रियेसंबंधी सविस्तर माहिती दिली.
या सेंटरमध्ये विदेशातून डॉक्टर केवळ इंडोस्कोपीसाठी प्रशिक्षण घेण्यास येणार आहेत. पाठीच्या मणक्यावर वेदनारहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली ही आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशी ही इंडोस्कोपी प्रणाली वापरून रुग्णांना यातून कसा दिलासा मिळेल. ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून याठिकाणी प्रशिक्षण घेणारे डॉक्टर्स अधिक कार्यक्षम होण्यासाठी हे ट्रेनिंग सेंटर मोलाचे काम करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment