वादग्रस्त ठरलेल्या कल चाचणीची परीक्षा आता मोबाईल अॅपवर
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
गेल्या दोन वर्षापासून वादाच्या भोवर्यात अडकलेली कल चाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे. मोबाईल अॅपवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कोणत्या क्षेत्राकडे आहे. याची माहिती मिळावी म्हणून शालेय शिक्षण विभागाने एका खासगी संस्थेला कलचाचणी परीक्षा आयोजित करण्याचे कंत्राट दिले आहे. दोन वर्षात यावर बरेच वाद निर्माण झाले होते. आता ही कल चाचणी परीक्षा मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी आता शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी आणखी एक काम शिक्षकांवर वाढणार आहे. त्यामुळे याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने श्यामची आई फाऊंडेशनच्या माध्यमातून कलचाचणी आयोजित केली जाते. शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा ही कलचाचणी मोबाईल अॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रत्येकी 2 आणि मास्टर ट्रेनर यावेळी घडविण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरला श्यामची आई फाऊंडेशन प्रशिक्षण देणार आहे. हे मास्टर ट्रेन प्रत्येक जिल्यातील शाळांना संबधित मोबाईल अॅप कसे हाताळायचे त्याबाबत प्रशिक्षण देणार आहे.
या मोबाईल अॅप कलचाचणीसाठी विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर समन्यवक नेमण्यात येणार आहे. ही कलचाचणी परीक्षा शाळेमध्येच घेण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व जबाबदार कर्मचारयांना ओटीपी आणि इतर माहितीसाठी मोबाईल नंबर नोंदविणे गरजेचे आहे. तालुकास्तरावरील प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना बोलावण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत 3 डिसेंबरला प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याला शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment