Header Ads

ad

नाशिकमध्ये आणखी एका शेतकर्‍याची आत्महत्या

नाशिक, 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मुंबईत जवळपास 20 हजार शेतकरी न्याय हक्कासाठी मोर्चा काढला आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.
नाशिकमध्ये आणखी एका शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. बागलाणच्या खामलोण येथील रामदास धोंडगे असं या शेतकर्‍याचं नाव आहे. कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून धोंडगे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
नाशिक जिल्ह्यातील दुसर्‍या दिवसातली ही तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच नांदगांव तालुक्यातील पळाशी येथे एका शेतकर्‍याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
दरम्यान, मुंबईत शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा मुंबईत पोहोचला आहे. हजारो कष्टकर्‍यांचा हा मोर्चा आझाद मैदानावर दाखल होईल. आझाद मैदानावर मोर्चा पोहोचल्यानंतर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी.जे कोळसे पाटील असतील. यानंतर मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.

No comments

Thank you for your feedback.