Header Ads

ad

पुण्यात भरधाव कारची दुभाजक तोडून ट्रॅव्हलरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरवर धडकली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले असल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. प्रतिक प्रमोद रामशेट्टीवार (वय 29) आणि राहुल रामचंद्र नायर (वय 28) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हे 2 मित्रांसह कारमधून औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने जात होते. औंध रस्त्यावरील केंद्रीय विद्यालयाजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळली.
यामध्ये कारमधील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधील एक जण जखमी झाला. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. स्थानिक नागरिकांनी जखमींना काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

No comments

Thank you for your feedback.