विरोधकांकडून विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधी घोषणाबाजी
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी शेतकरी प्रश्न, आरक्षण यावरुन घोषणाबाजी करण्यात येत आहे. देवेंद्र मोदी सरकार विरोधात विरोधकांची नारेबाजी करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री विधान भवनावर दाखल झाले आहेत. शिवरायांच्या वेषात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये आले आहेत.
मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी शिवरायांच्या वेशात येऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. भाजपने सत्तेवर येण्याआधी विविध आश्वासने दिली. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचाही यात समावेश होता. मात्र ती पूर्ण झाली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम अजून सुरु झालेले नाही. महागाई वाढत आहे. शेतकरी सरणात उडी मारुन आत्महत्या करीत आहेत. औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. ही स्थिती सरकारने वेळीच नियंत्रणात आणावी अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment