मराठा,धनगर आरक्षणावरुन गोंधळाची शक्यता
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. आज दुपारी बारा वाजता या प्रश्नावरुन सभागृहात गोंधळाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरक्षणासंबंधीचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला जावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. पण, त्यातील अर्धाच अहवाल स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा अहवाल मांडून त्यासंबंधी स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. यावरुन विरोधक आक्रमक पावित्रा घेण्याची शक्यता आहे.
अन्न आणि दूध भेसळ रोखण्यासाठी आता कठोर पावले उचलली जातील. भेसळ करणे हा अजामिनपात्र गुन्हा असेल. गुन्हेगाराला आजन्म कारावासाची शिक्षा होईल, असे अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. आमदार भाई जगताप यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
दूध उत्पादक कंपन्या राज्यातील शेतकर्याकडून दूध गोळा करतात. मात्र ते ताजे दूध ग्राहकांकडे पोहचत नाही. त्याचे विषात रूपांतर होते. यासाठी भेसळखोर हे शहरात बसून दूधात डिटर्जंट पावडर, युरिया स्कीम्ड दूध वापडर, कॉस्टीक सोडा, ग्लुकोज, परफाइंड, मीठ, स्टाचव असे विविध घटक टाकून विषारी दूध तयार करतात. हे भेसळखोर लाखो लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई आणि शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जगताप यांनी केली होती.
Post a Comment