मिठी नदीच्या सुशोभिकरण कामाचा पर्यावरणमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मिठी नदीच्या सुशोभिकरण कामाचा पर्यावरणमंत्र्यांनाी आज आढावा घेतला. मुंबईतील मिठी नदी प्रदूषणमुक्त व सुशोभिकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी संबं?धित अधिकार्यांना यावेळी दिले.
मुंबईतील मिठी नदी प्रदूषणमुक्त व सुशोभिकरण कामाच्या सद्यस्थिती संदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक यशवंत सोनटक्के, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील उपस्थित होते.
श्री.कदम यांनी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, मलनि:सारण वाहिन्यांचे काम, नालेसफाई, नदीतील गाळ काढणे, कचरा काढणे तसेच पुन्हा कचरा नदीमध्ये न जाण्यासाठी जाळ्या बसविणे, नदीचे सुशोभिकरण आणि सुरक्षितता, नदी काठाने झाडे लावणे, नदी परिसरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सुविधा निर्माण करणे, बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करणे, पुन्हा कचरा होणार नाही, परिसरात अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेणे, या कामांचा तसेच पुढे करावयाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी श्री.कदम म्हणाले, मिठी नदीला प्रदूषणमुक्त करून पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यामुळे नदी परिसराला पर्यटनस्थळाचे स्वरुप प्राप्त होईल.
यावेळी चंद्रभागा, मुळा-मुठा, या प्रमुख नद्या प्रदूषमुक्त होण्यासाठी करावयाच्या कामाचाही आढावा पर्यावरणमंत्र्यांनी घेतला.

Post a Comment