जाळ्यात अडकलेल्या ’व्हेल-शार्क’ माशाची मच्छिमारांनी केली सुटका
पालघर,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
वडराई येथून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात भला मोठा व्हेल शार्क मासा अडकला होता. त्यानंतर या मच्छिमारांनी त्या माशाची सुखरूपपणे सुटका केली आहे. हा मासा जवळपास 30 फुट लांबीचा होता. यावेळी जाळ्यात अडकलेल्या व्हेल माशाच्या सुटकेचा व्हिडिओ कॅमेर्यात कैद करण्यात आला आहे.
हितेंद्र मेहेर हे त्यांची अमर साई ही बोट घेऊन आपल्या सहकार्यांसोबत मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास वडराई बंदरातून मासेमारीसाठी गेले होते. समुद्रात 12 नॉटिकल मैल क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील जाळे मासे पकडण्यासाठी लावले असता, काही वेळानंतर या जाळ्यामध्ये त्यांना सुमारे 25 ते 30 फुटांचा व्हेल मासा अडकल्याचे आढळले. हा मासा आपल्या सुटकेसाठी धडपड करीत होता, जाळ्यात अडकल्याने त्याची सुटका होऊ शकत नव्हती. त्यानंतर बोटीतील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. बोटीत असलेल्या घोश्या (काठीला बांधलेले टोकदार आयुध) च्या सहाय्याने त्याच्या शरीराभोवती गुंडाळलेले जाळे कापले. या माशाला कुठलीही इजा न करता त्यांनी सुखरूपपणे हे जाळे काढून घेतेल आणि त्याला समुद्रात मुक्त केले.
व्हेल मासा हा शार्क माशांच्या प्रजातीपैकी एक आहे. व्हेल शार्क माशांच्या आकारासंबंधी अनेक नोंदी आहेत. विशेत: जगातील सर्वाधिक मोठा समुद्री जीव म्हणून व्हेल मासा ओळखला जातो. जगभरात आजवर आढळलेल्या सर्वाधिक लांब व्हेल शार्क माशाची लांबी 12.65 मीटर (41.5 फूट) तर वजन तब्बल 21 टन इतकी आहे. इतर शार्क माशांच्या प्रजातींच्या तुलनेत व्हेल शार्क ही प्रजाती शांत स्वभावाची असते. इतर शार्क माशांप्रमाणे व्हेल शार्क अजिबात हल्ला करत नाही. प्रवाहातील पाणी पिऊन त्याद्वारे आलेले लहान मासे खाऊन जगतात. समुद्री पर्यावरण राखण्यात या माशाचा मोठा वाटा आहे. आपल्या शरीरातून टाकलेल्या महाकाय विष्ठेच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होते. या प्लवंगा शेजारीच मासे आपली अंडी घालीत असल्याने माशाच्या पिलांचे संवर्धन होते.

Post a Comment