Header Ads

ad

उकणी कोळसा खदान परिसरात पट्टेदार वाघाचा वावर

यवतमाळ,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
वणी तालुक्यातील उकणी कोळसा खदान परिसरात आज सकाळी काही नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. या भागातील रस्त्यावरून जाताना नागरिकांना झुडपामध्ये वाघ बसल्याचे आढळून आले. झुडुपांमध्ये वाघ दिसतात नागरिकांनी त्याला मोबाईलच्या कॅमेरात कैद केले.
वाघाच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर याची माहिती नागरिकांनी तात्काळ वनविभागाला दिली. 5 नोव्हेंबरला कोलारपिंपरी कॉलनीजवळील अहेरी रोडवर सांयकाळच्या सुमारास गावकर्‍यांना वाघाचे दर्शन झाले होते. या परिसरातील जंगलामध्ये टी 1 वाघिणीचे दोन बछडे व टी 2 वाघ अद्यापही वावरत असावे, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, या परिसरातील वाघ हा दुसराच असल्याचे दिसून येत आहे.
राळेगाव, पांढरकवडा, वणी आणि झरीजामणी तालुका तसेच तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच वाघाचे दर्शन होते. आज सकाळच्या सुमारास उकणी भागांमध्ये असेच वाघाचे दर्शन नागरिकांना झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग पांढरकवडा यांनी या परिसरात पाहणी केली, तसेच विविध पथकामार्फत या वाघाच्या पाऊलखुणा शोधण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

No comments

Thank you for your feedback.