महापौर बंगल्याला मनसेचा विरोध, राज ठाकरेंनी घेतली महापौरांची भेट
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिवाजी पार्क येथील जिमखान्याच्या भूखंडावरील महापौर बंगल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इतर मागण्याही महापौरांसमोर मांडल्या.
रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरावरील फेरीवाल्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करा. अन्यथा आम्ही कारवाई करु अशी अप्रत्यक्ष धमकीच मनसेने दिली आहे.
फेरीवाल्याच्या प्रश्नावर मनसे नेहमीच आक्रमक राहिली आहे. त्यासंबंधीचा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज ठाकरे आणि महापौर यांच्यामध्ये आणखी काय बोलणे झाले हे सविस्तर कळू शकले नाही.

Post a Comment