Header Ads

ad

न्यूयॉर्कहून मुंबईसाठी रवाना झाला ‘देसी गर्ल’चा निक (मनोरंजन)


मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरू असून ‘दीपवीर’चा भव्यदिव्य विवाहसोहळा अलिकडेच पार पडला. त्यापाठोपाठ आता देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्याही विवाहाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. प्रियंका-निकचा विवाहसोहळा जोधपूरच्या उमैद भवनमध्ये संपन्न होणार आहे. निक त्यासाठी न्यूयॉर्कहून मुंबईकरीता रवाना झाला आहे.
येत्या 2 डिसेंबरला प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचा विवाहसोहळा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हे पाच दिवस रंगणार आहे. न्यूयॉर्कहून निक रवाना झाला आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो यात विमानात बसलेला दिसत आहे. तो न्यूयॉर्कचा निरोप घेऊन मुंबईला रवाना झाल्याचे त्याने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
‘दीपवीर’ प्रमाणे प्रियंका आणि निक हे देखील दोन पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. जोधपूर येथे पारंपारिक पद्धतीने विवाह झाल्यानंतर प्रियंका निक जोनाससोबत पून्हा ख्रिश्‍चियन पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे. मोजक्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा संपन्न होईल.

No comments

Thank you for your feedback.