Header Ads

ad

चंद्राबाबू नायडू यांचा 3 वर्षाचा नातू 18.71 कोटींचा मालक

अमरावती,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत आपल्या कुटुंबाची मालमत्ता जाहीर केली. लोकेश यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चंद्राबाबूंचा 3 वर्षीय नातू नारा देवांश हा त्यांच्यापेक्षा सहापट श्रीमंत असून 2.99 कोटी रुपयांची नायडू यांची संपती आहे तर नातू देवांश हा 18.71 कोटी रुपयाचा मालक आहे. तर लोकेश यांची स्वत:ची मालमत्ता 6 कोटींनी वाढून 21.40 कोटी झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मुख्यमंत्री नायडू यांच्या मालमत्ता 46 लाख रुपयांची वाढ झाली आहे. कुटुंबातील सर्वात श्रीमंत सदस्य नायडूची पत्नी भुवनेश्‍वरी असून 31.01 कोटी रुपये त्यांची मालमत्ता आहे. यावर्षी त्यांच्या मालमत्तेत 5 कोटींनी वधारली आहे. लोकेश यांची पत्नी ब्रह्मणी यांच्या संपत्तीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्यावर आली आहे. त्या 7.72 कोटी रुपयाचे मालक आहेत. म्हणजे एकंदरीत नायडू परिवारात ब्रह्मणी यांना सोडले तर सर्वांच्याच संपत्तीत भरघोस वाढ दिसून आली आहे.

No comments

Thank you for your feedback.