सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वींची 99 व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी निवड
मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गज्वी यांची तनमाजोरी, किरवंत आदी नाटके प्रचंड गाजली. त्यांच्या नाटकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली असून देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग चालू आहेत.
बोधी नाट्य चळवळीमुळे देशभरातील रंगकर्मी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी अशोक समेळ, श्रीनिवास भणगे, सुनील साकोळकर ही नावेदेखील चर्चेत होती. मात्र, गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान यावर्षीच्या नाट्यसंमेलनाचे ठिकाण अजूनही जाहीर झाले नसून लवकरच त्याबद्दलची घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment