Header Ads

ad

डिपी बसवून 8 दिवसांत वीज सुरळीत करा, अन्यथा रूमणे मोर्चा काढू - अशोक चव्हाण

नांदेड,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
पाणी आहे, तर वीज नाही, नापिकी होऊनही दुष्काळ नाही. पिक विमा व हमीभाव नाही. यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला. तसेच 8 दिवसांमध्ये नादुरूस्त डिपी दुरूस्त करून वीज सुरू करा, अन्यथा शासनाच्या विरोधात रुमणे मोर्चा काढू असा इशारा त्यांनी पाळजच्या (ता. भोकर) सभेत सरकारला दिला.
भोकर तालुक्यातील 13 कोटी 9 लाख रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या विकास कामानिमित्त पाळज येथे घेण्यात आलेल्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की भोकर तालुक्यातील सिंचनाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. दिवशीच्या तलावाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहे. तालुक्यातील सिंचनाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. शासनाचे मराठवाड्यातील प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. आता भाजपा सेनेकडे मागण्यांसाठी हात पसरण्याची गरज नाही. कारण येणारे सरकार हे काँग्रेसचे असणार आहे. यावेळी नरसारेड्डी गोपीडवाड, जगदीश पाटील, सत्यम रेड्डी यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी मंचावर आमदार अमिता चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, आप्पाराव सोमठाणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदिश भोसीकर, तिरुपती कोंढेकर, माधव कदम, मंगाराणी अंबुलगेकर, गणेश राठोड, नरसारेड्डी गोपीडवाड, बाबुराव सायाळकर, रामचंद्र मुसळे, कमलबाई शिंदे, राजू पाटील दिवशीकर, शंकरराव देशमुख, गुलाबराव चव्हाण, सत्यम रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments

Thank you for your feedback.