अयोध्येत कायद्याच्या मार्गानेच राम मंदिराचे निर्माण - रामदास आठवले
नागपूर,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अयोध्येत कायद्याच्या मार्गानेच राम मंदिराचे निर्माण होईल. सर्व जातीसमुदायांनी न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राम मंदिरासाठी मोर्चे काढून केंद्र सरकारवर अध्यादेश काढण्यासाठी दबाव टाकल्याने काहीही साध्य होणार नाही. उलट, केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढतील, असेही आठवले यावेळी म्हणाले.
सध्या देशभरात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण चांगेलच तापले आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने देशात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्णयाची प्रत्येक जाती समुदायाने प्रतीक्षा करावी, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिराचा संकल्प घेऊन अयोध्येला जात आहेत. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल अशी कोणतीही कृती करू नये. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी. हे प्रकरण सामोपचाराने सोडवले जाऊ शकते. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे सांगत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा टाळायला हवा. राम मंदिरासाठी केंद्राने अध्यादेश काढण्याची घाई करू नये. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का बसेल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Post a Comment