केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत सलमानची सायकलिंग
मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सध्या आपल्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बॉलिवूड भाईजान सलमान खान व्यस्त आहे. दरम्यान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भाईजान चर्चेत असतो. त्याचा नुकताच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबत सायकलिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील मेचुका या डोंगराळ भागात सायकलिंग करतानाचा आहे. सलमान, रिजीजू आणि पेमा खांडू यांच्याशिवाय आणखीही 2 व्यक्ती त्यांच्यासोबत यात सायकलिंग करत असल्याचे दिसत आहे. सायकलिंग करत असलेले रस्ते पाहता हा अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भाग असल्याचे लक्षात येत आहे. या खास व्हिडिओला सलमानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Post a Comment