Header Ads

ad

’दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या माविमच्या उपाध्यक्ष श्रध्दा जोशी-शर्मा यांची मुलाखत

मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ’दिलखुलास’ कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवार दि.24 आणि सोमवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश व या विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, त्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाच्या सुविधा व लाभ घेण्यासाठीचे निकष, महिला बचत गट योजना, महिलांना उद्योगाच्या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विभागाद्वारे देण्यात येणारे पुरस्कार तसेच विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या नवीन उपक्रमांबाबतची माहिती श्रीमती जोशी-शर्मा यांनी ’दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

No comments

Thank you for your feedback.