बदलीचा आदेश अद्याप मिळाला नाही, तुकाराम मुढेंची स्पष्टोक्ती
नाशिक 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत. मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तर मला अद्याप बदलीचे आदेश मिळाले नाहीत, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या गेटवर मुंढे यांना परत बोलवण्यासाठी नागरिक घोषणाबाजी करत आहेत. तसेच सत्ताधार्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. गाडीतून उतरून ते थेट त्यांच्या दालनात गेले आहेत.
Post a Comment