तुकाराम मुंढे म्हणतात, नाशिककरांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, ’त्या’ प्रश्नावर नो कमेंटस
नाशिक,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयासाठी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंना अवघ्या 9 महिन्यांत बदलीला सामोरे जावे लागले आहे. तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया समोर आली असून नाशिककरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहे, तर बदलीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
नाशिककरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त मुंढे यांनी आभार मानले आहेत. ‘ आपल्या लाभलेल्या कार्यकाळात जमेल तेवढी चांगली कामे करण्याचा प्रयत्न केला. काही प्रकल्प पूर्ण झाले, तर काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही अॅपच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून 30 हजार तक्रारींचे निवारण झाले असेही मुंढे यांनी सांगितले.
प्लास्टिकपासून इंधन तयार करणे, सेप्टिक पेस्टपासून एनर्जी तयार करणे, असे अनेक प्रकल्प राबवले. शहरात 24 तास पाण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच शहरात 7 हजारांपेक्षा जास्त स्ट्रीट लाईट लावले जाणार आहेत, रस्त्यांचे 9 मीटरपर्यंत चौपदरीकरण करण्यात येणार आहे. टॅक्स रिफॉर्मच्या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या त्याच्या माध्यमातून नाशिक मनपाला कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल. तसेच युवकांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध केंद्र उघडले जाणार आहेत. ’वॉक विथ कमिशनर’ सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्या. तसेच नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन कामांचे नियोजन करण्यात आले. नाशिककरांच्या सहकार्यामुळे 9 महिन्याच्या कार्यकाळात काम करतांना समाधान मिळाले, असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Post a Comment