शेतकर्यांच्या मुद्यासाठी लढा देणारे राज ठाकरे ‘मैदानात’ आलेच नाहीत, शिक्षक संघटनांचीही बाहेरच्या बाहेर घेतली भेट
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आगामी निवडणूक लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून मनसे विविध सामाजिक विषयांना हात घालत आहेत. मनसेच्या इंजिनने वेग धरला असून राजकीय मैदानात सक्रीय झाल्याच्या चर्चा जोर धरत असताना गुरुवारी मात्र वेगळेच चित्र बघायला मिळाले. आझाद मैदानात आंदोलनसाठी बसलेल्या काही शिक्षक संघटनांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी भेट घेतली. परंतू ही भेट मैदानाबाहेरच झाली. आझाद मैदानातील विविध संघटनाना भेटण्यासाठी गुरुवारी मोठी नेते-मंडळी आली असताना राज यांनी मैदानाबाहेर भेट घेतली. यामुळे ‘मैदानात’ मनसेने उडी का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात अनेक मोर्चेकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी काही शिक्षक संघटनांची भेट घेणार होते. परंतु शिक्षक संघटनाच्या शिष्टमंडलाने आझाद मैदानाबाहेरच राज यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
गुरुवारी आझाद मैदानात मोठ्या संख्येने आदिवासी, शेतकरी मोर्चासाठी आले होते. विदर्भ, मराठवाडा या या भागातील शेतकर्यांनी लोकसंघर्ष मोर्चा काढला होता. यामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरे मैदानात आले नसल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे शेतकर्यांच्या मुद्यावरून मनसेने सरकारला धारेवर धरले आहे. सरकारच्या निषेधार्थ 27 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे मनसेचा मोर्चाही निघणार आहे. शेतकर्यांच्या मुद्यासाठी लढा देणार्या राज ठाकरे यांनी गुरुवारी मात्र आझाद मैदानातील शेतकर्यांशी संवादही साधला नाही. त्यामुळे मनसेचा शेतकर्यांसाठीचा लढा हा केवळ निवडणुकीसाठीचा मुद्दा आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment