बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड न मिळणे हे दुर्दैर्वं, राज यांनी शिवसेनेवर डागली तोफ
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
बाळासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्रात कुठेही, केव्हाही जागा उपलब्ध होऊ शकते. नाशिकमध्ये आम्ही साकारलेलं बाळासाहेबांचं देशातलं पहिलं स्मारक याचं उत्तम उदाहरण आहे. इतक्या बिल्डरांना भूखंड वाटले गेले परंतु बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही यासारखं दुर्दैर्वं नाही, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची गुरुवारी दुपारी महापालिकेत जाऊन भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते. अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्यासह राज यांनी शिवाजी पार्क येथील खेळासाठी राखीव असलेल्या जागेबाबत चर्चा केली.
आयुक्तांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज यांनी शिवसेना आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. शिवाजी पार्क जिमखान्याची जागा टेनिस आणि बॅडमिंटन खेळासाठी राखीव आहे. जिथे लोकं वर्षानुवर्षे खेळतात तिथे महापौर बंगला प्रस्तावित आहे. जिमखानाच्या खेळाच्या जागेवर महापौर बंगला होऊ देणार नाही, असे राज यावेळी म्हणाले. आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ज्या शिवसेना प्रमुखांनी स्वत:चा महापौर त्या महापौर बंगल्यात बसावा यासाठी संघर्ष केला तिथूनच महापौर बाहेर काढला जातोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कोणतीही शासकीय जागा स्मारकासाठी दिली जाणार नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा न मिळणे हे दुर्दैर्वं असल्याचे म्हणत राज यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर आणि त्या शहराचा महापौर वास्तव्यासाठी वणवण भटकतोय. ही महापौरपदाची थट्टा असल्याचे ते पुढे म्हणाले.
तर फेरीवाल्यांना मनसे हटवेल
मनसेच्या फेरीवालामुक्त स्थानक परिसर आंदोलनानंतर न्यायालयाने आदेश दिला होता कि, ङ्खरेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरात फेरीवाले बसता कामा नये.ङ्ग त्यानंतर सर्व रेल्वे स्थानक परिसर सुटसुटीत, सुरळीत झाले होते. परंतु आता महापालिकेच्या भ्रष्ट प्रभाग अधिकार्यांमुळे पुन्हा फेरीवाले बसायला सुरुवात झाली आहे. न्यायालयाचे आदेशही असे झुगारले जाणार असतील तर हवीत कशाला ती न्यायालयं ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्यामुळे स्थानक परिसरातील 150 मीटरपर्यंतचे फेरीवाले हटविले जावेत हे आम्ही आयुक्तांना सांगितलं. जर महापालिकेने ते फेरीवाले हटविले नाहीत तर मनसे हटवले असा इशारा राज यांनी दिला.

Post a Comment