अयोध्येला हिंदूंच्या भावना म्हणून शिवरायांच्या जन्मभूमीतील माती कलशात घेऊन निघालो आहे
पुणे,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
तमाम हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असून शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना कलशमध्ये घेऊन अयोद्धेला निघालो असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
माझ्यावर आरोप करणार्या विरोधकांची कुवत काय, हे मला ठाऊक आहे. हा मुद्दा आणखी किती निवडणुकांमध्ये अजून घेणार आहात? मी तेच विचारायला अयोध्येत निघालो आहे. अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन मी घेण्यासाठी चाललो आहे. मंदिर उभारणीच्या कार्याला त्यामुळे वेग मिळेल, असे उद्धव यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, ही केवळ शिवनेरीची माती नाही तर तमाम हिंदूंच्या भावना आहेत. महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आले, त्या ठिकाणीची माती घेऊन मी अयोध्येला निघालो आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे अयोध्येला निघण्यापूर्वी गुरुवारी पुण्यात पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी विधिवत पूजन केले. शिवनेरी गडावरील माती कलशात भरली. मातीचा कलश ते आपल्यासोबत अयोद्धेला घेऊन जाणार आहेत.
Post a Comment