मुंबई -पुणे महामार्गावर अपघात, विदेशी कारचालक ताब्यात
रायगड,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मुंबई-पुणे महार्गावर लघुशंकेसाठी उतरलेल्या एका प्रवाशाला मागून येणारया कारने जोरात धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तो प्रवासी जागीच ठार झाला. महंमद अली फारूक अली (35) असे त्या प्रवाशाचे नाव असून तो नांदेडचा रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी एका विदेशी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
महंमद आपल्या तवेरा कारने मुंबईकडून पुण्याकडे निघाले होते. खालापूर तालुक्यातील कुंभवली गावापाशी आले असता त्यांनी गाडी थांबवली आणि लघुशंकेसाठी ते खाली उतरले. मात्र, तेवढ्यात मागून येणारया होंडा सिटी कारने त्यांना उडविले. या अपघातात महंमद यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात केलेल्या गाडीचा पाठलाग केला. तेव्हा अपघात झालेल्या घटनास्थळापासून 2 किलोमीटर अंतरावर त्यांना ही गाडी सापडली. मात्र, गाडीत कोणीच नव्हते. पोलिसांनी अजूबाजूला तपास केला असता बाजूच्या झाडीमध्ये एक विदेशी कारचालक लपून बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्या कारचालकाला ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजित काईगडे करत आहेत.

Post a Comment