Header Ads

ad

खिचडी-भजे हॉटेलच्या नावाखाली बियर-बार केले सुरु, महिलांनी हाणून पाडला डाव

नांदेड,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
खिचडी-भजीचे हॉटेल सांगुन बार सुरु करण्याचा प्रयत्न करणार्‍यास परिसरातील महिलांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. जुना कौठा येथील महिलांनी हा प्रयत्न हाणुन पाडला. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी बारच्या नामफलकाची तोडफोड करुन फलक जाळून टाकला.
शहरातील जुना कौठा भागात रविनगर परिसरात खिचडी-भजीचे हॉटेल सुरु करत आहे, असे सांगून एकाने परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्?या घेतल्या. परंतु, प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी खिचडी-भजे नव्हे तर ‘पद्मावती बार अ‍ॅन्ड रेस्टारंन्ट’ हा नामफलक झळकल्याने महिला संतप्त झाल्या. या महिलांनी या नामफलकाची तोडफोड करुन बार सुरु करण्यास प्रचंड विरोध केला. आक्रमक झालेल्या महिलांनी यावेळी रास्ता रोको आंदोलन केले. तर महिलांच्या या आंदोलनाला साथ देत नगरसेवक राजू काळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महिलांच्या या मागणीला पाठींबा दिला.
घटनेची माहिती मिळताच सिडको ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्यासह कर्मचार्?यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तनाव निवळला.

No comments

Thank you for your feedback.