क्रांती दिनाच्या पार्श्वभुमीवर भीम आर्मी आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आमनेसामने ?
पुणे,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. क्रांती दिनानिमित्त भीम आर्मीने राज्यस्तरीय भिमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन केले आहे. मात्र, या महासभेवर नियंत्रण आणण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.
पुण्याच्या एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर 30 डिसेंबरला भीम आर्मीची ही महासभा पार पडणार आहे. या महासभेला भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद उर्फ रावण पुण्यात येणार आहेत. तसेच 31 डिसेंबरला सावित्रीबाई पुणे विद्यापीठात ’संवाद आंबेडकरी तरुणाईशी’ या कार्यक्रमालासुद्धा ते हजेरी लावणार आहेत. 3 दिवसीय कार्यक्रमाची तयारी सुरू असून या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाकडे परवानगीदेखील मागण्यात आली आहे. मात्र, महासभेत एखाद्या समाजाविरोधातील जहाल वक्तव्य होऊ नये यासाठी या महासभेवर नियंत्रण आणण्याची मागणी पुण्याचे ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आर्थिक निकषावर असावे
मराठा आरक्षण आर्थिक निकषावर असावे ही आमची भूमिका असल्याचे मत दवे यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो. काही काळाने आरक्षणाचा काय फायदा झाला याचा आढावा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फरक पाहवा. फरक पडला नसल्यास आरक्षण रद्द करुन ते समाजातील आर्थिक गरजूंना देण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

Post a Comment