Header Ads

ad

सेल्फीसाठी खड्डा शिल्लक नसेल, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण - सुप्रिया सुळे

कोल्हापूर,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सेल्फी काढण्यासाठी खड्डा शिल्लक राहिला नाही, तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सुप्रिया सुळे कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आल्या आहेत. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुळे यांनी ’सेल्फी विथ पॉटहोल’ मोहीम सुरू करत सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेल्फी काढण्यासाठी खड्डे शिल्लक राहणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याला सुप्रिया सुळे यांनी खास शैलीने प्रत्युत्तर दिले. तसेच 4 वर्षांमध्ये रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊन काम चांगले का होत नाही, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील दुष्काळप्रश्‍नी भाजप सरकार असंवेदनशील आहे. तसेच मराठा आरक्षणप्रश्‍नीसुद्धा ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप सरकार या समाजाचा विश्‍वासघात करत आहे, असेही त्या म्हणाल्या. गेल्या 4 वर्षात राज्य मंत्री मंडळाच्या 208 बैठका झाल्या, मात्र एकाही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणावर निर्णय का घेतला नाही, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारमधील मंत्री आणि आमदार वेगवेगळी जाहीर विधाने करत आहेत. शासनही वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

No comments

Thank you for your feedback.