Header Ads

ad

घाटकोपरमधील फेरीवाल्यांची पालिका मुख्यालयावर धडक

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
घाटकोपर पूर्व येथील हिंगवाला लेनमधील फेरीवाल्यांनी आज महापालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळी व्यवसाय करण्यास परवानगी न दिल्यास पालिका मुख्यालयासमोर व्यवसाय करण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या 2 वर्षांपासून हिंगवाला लेन येथील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अन्य ठिकाणी फेरीवाले सर्रास व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाला संघ यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी निदर्शने केली.
गेली अनेक वर्षे फेरीवाले भाजी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. मात्र, आता व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यवसाय करायला परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्यालयाच्या इमारतीवर चढलेले फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी यांना पालिका सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments

Thank you for your feedback.