Header Ads

ad

योगी सरकारने शिवसेनेच्या सभेला नाकारली परवानगी

मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली असून शिवसेनेने येथे शक्ती प्रदर्शन करणारच असा ‘पण’ केला आहे. गुरुवारपासून त्यासाठी शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आजही रेल्वेने शिवसैनिक अयोध्येला निघाले आहेत.
दसरा मेळाव्यात ‘चलो अयोध्ये’चा नारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर अयोध्येकडे जाण्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली. शिवसैनिक आता याला साथ देण्यासाठी मोठ्या जल्लोषात अयोध्येकडे निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या 24 नोव्हेंबरला शरयू नदी किनार्‍यावर प्रभू रामचंद्र यांची आरती होणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी वादग्रस्त ठरलेल्या जागेवर जाऊन उध्दव ठाकरे राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत.

No comments

Thank you for your feedback.