Header Ads

ad

‘त्या’ साखर कारखान्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल करणार

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार, मुकादम यांच्या नावावर फसवणूक करणार्‍या साखर कारखान्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली.
ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या नावावर साखर कारखानदारांकडून फसवणूक केली जाते. यासंदर्भात आपण लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर 40 मिनिटे चर्चा झाली, मात्र सरकारला समाधानकारक उत्तर देता आले  नाही, अशी माहिती मेटे यांनी दिली.
रोजगार हमी योजनेत जेवढी मजुरी दिली जाते तितकीही ऊसतोड कामगारांना दिली जात नाही. मुकादमाची कागदपत्रे घेऊन त्याच्या नावावर कारखानदार कोट्यवधीची कर्जे काढतात. त्याला आळा घालावा आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कार्यान्वित करावे, अशी मागणी आपण केल्याचे मेटे म्हणाले.
या मागण्यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करु, फसवणूक करणार्‍या कारखान्याची चौकशी करुन गुन्हे दाखल करु आणि हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत खाते उघडून त्यात पैसे जमा करण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याचे मेटे यांनी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.