Header Ads

ad

तुकाराम मुंडे यांची मुंबईत मंत्रालयात निजोयन विभागात सहसचिवपदी बदली

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची मुंबईत मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. मुंडे यांच्या नव्या नियुक्तीबाबतचे परिपत्रक अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी गुरूवारी सकाळी काढले आहे. मुंडे यांची बदली झाल्याचे दोन दिवसापासून चर्चा सुरू होती.
दरम्यान, मुंडे यांच्या बदलीचे आदेश निघताच नाशिकमद्ये भाजप पदाधिकार्‍यांनी फटाके फोडले. महापौरांच्या निवासस्थानाबाहेरच फटाके फोडत भाजप समर्थकांनी जल्लोष साजरा केला. तर, मुंडे यांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी नाशिकमधील नागरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नागरिक जमले असून, नगरसेवक व भाजप सरकारविरोधात घोषणा देत आहेत.
नाशिक महानगरपालिकेत तुकाराम मुंडे हे एक प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते जेथे जातात तेथे लोकाभिमूख काम करण्यावर भर देतात. मात्र, सत्ताधारी लोक नेहमीच मुंडे यांच्याविरोधात तक्रारी करतात. गेल्या 8-9 महिन्यापासून नाशिक महापालिकेत आयुक्तपदी काम करणार्‍या मुंडे यांच्याविरोधात तेथेही सत्ताधारी भाजपने तक्रारी केल्या. मुंडे यांना लवकरात लवकर बदला अन्यथा निवडणुकीत याचा मोठा फटका बसेल अशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी 2018 मध्येच नाशिक महापालिकेत आयुक्तपदी आलेल्या मुंडे यांची बदली करताना देवेंद्र फडणवीस सावध भूमिका घेत होते. मात्र, आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी राहिल्याने मुंडे यांची अखेर बदली फडणवीस सरकारने केली आहे. मुंडे यांच्या मागील 12 वर्षाच्या प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत 11 वेळा बदली करण्यात आली आहे.
बदलीचा आदेश मिळाला नाही- मुंडे
माझी बदली झाल्याबाबत मला अजून काहीही अधिकृत पत्र मिळाले नसून, मी रोजच्या प्रमाणेच आजही काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंडे यांनी बदलीबाबत दिली आहे.

No comments

Thank you for your feedback.