Header Ads

ad

समता परिषद पुणे महानगर अध्यक्ष पदी रघुनाथ ढोक यांची निवड

पुणे,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद   तर्फे थोरसमाज सुधारक महात्मा फुले यांची 128 वी पुण्यतिथी निमित्त  28 नोव्हेंबर 2018 रोजी अभिवादन आणि समता पुरस्कार सोहळा आढावा बैठक दि.21 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 4 वाजता सेंट्रल पार्क हॉटेल येथे संपन्न झाली.या वेळी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी  सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ ढोक  यांची पुणे महानगर पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड केली ते निवडीचे पत्र मा.खासदार समीर भुजबळ  यांचे शुभहस्ते देण्यात आले.या प्रसंगी  कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे ,बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार दिप्ती चवधरी,आकृरशेठ कुदळे,रवी सोनावणे,संदीप लडकत,अंबादास गारूडकर,वसंतराव लोंढे,प्रा.गौतम बेंगाळे,मंजिरी धाडगे नगरसेवक संतोष लोंढे , सुरेखा भुजबळ, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रितेश गवळी तर आभार प्रदर्शन रवी चौधरी यांनी मानले यावेळी मोठया संख्येने समता सैनिक उपस्थित होते.
रघुनाथ ढोक अनेक सामाजिक,सहकार व शैक्षणीक  संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांची  निवड सार्थ झाल्याचे कौतुक होत आहे.

No comments

Thank you for your feedback.