Header Ads

ad

मराठा क्रांती मोर्चा व सर्वपक्षीय मराठा आमदाराची बैठक स्थगित, आता 27 ला बैठक

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरूवारी (ता. 22) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात सर्वपक्षीय आमदारांची बैठक स्थगित करण्यात आली आहे. गुरूवारी दुपारीच दोन्ही सभागृहे बंद झाल्याने सर्वपक्षीय आमदार लवकर निघून गेले तसेच पुढील तीन दिवस सलग सुट्टी आल्याने आज होणारी बैठक येत्या 27 नोव्हेंबरला होणार असल्याचे या मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय आमदारांची भूमिका काय असावी याबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, आमदारांची संख्या कमी असल्याने व गुरूवारी दुपारी 1 पूर्वीच दोन्ही सभागृहे तहकूब झाल्याने आमदार आपापल्या गावांकडे निघून गेले. त्यामुळे ही बैठक स्थगित करून येत्या 27 नोव्हेंबरला ही बैठक होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.