Header Ads

ad

...तर डॉ.आंबेडकरांनादेखील देशद्रोही ठरवले असते : डॉ.आनंद तेलतुंबडे

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते. एका आधुनिक समाज उभारणीसाठी डॉ. आंबेडकर झटत होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांनादेखील या वातावरणात देशद्रोही ठरवले असते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले. सध्या सुरू असलेल्या ब्राह्मण्य, पितृसत्ताकविरोधी मोहिमेवर त्यांनी आपले व्यक्त केले. ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद या दोन भिन्न बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. वर्चस्ववादासाठी ब्राह्मण्यवाद शब्द वापरला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले की, हिंदूबहूल देशात मुस्लिम सुरक्षित राहू शकत नाही असे वातावरण तयार केले गेले. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र, त्याचवेळेस डॉ. आंबेडकर बळजबरी करुन एखाद्या करारावर स्वाक्षर्‍या करुन घेण्याऐवजी जनमतासाठीदेखील आग्रही असल्याचे तेलतुंबडे यांनी सांगितले. मात्र, आजच्या परिस्थितीत त्यांची ही भूमिका देशद्रोहीपणाची ठरवून त्यांच्यावर खटला दाखल झाला असता असेही त्यांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारीत नवीन समाजाची निर्मिती करायची होती. संविधानात या मूल्यांवर आधारीत समाजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, मागील सात दशकांच्या काळात गरीब हा आणखी गरीब होत असून संपत्ती काही मूठभरांच्या हातात एकवटत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.