Header Ads

ad

जनतेला अन् भाजप पक्षालाही अच्छे दिन - रावसाहेब दानवे

लातूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
जनतेला पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्‍वास आहे. आगामी निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची गर्दी होत असल्याने सध्या जनतेला आणि भाजप पक्षालाही अच्छे दिन आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ते शहरात माध्यमांशी बोलत होते. लातूरकरांसाठी उजनी पाण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. पूर्वी पाणीप्रश्‍नाची पोलखोल झाली नसल्यानेच ही वेळ आल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदार बुथप्रमुखांची नेमणुकीनिमित्त आज रावसाहेब दानवे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. ते म्हणाले की, पक्षाला 2014 पूर्वी उमेदवार मिळत नव्हता. आता तालुका नाही तर गावपातळीवर इच्छूकांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाजप पक्ष सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांच्याही मनात रुजला आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या 4 वर्षात केवळ विकास कामालाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले. नागरिकांची विचारप्रणाली बदलत आहे. त्यामुळे जातीवर मतदान हे आता कालबाह्य झाले आहे. गेल्या 2 वर्षात सर्वत्र चित्र बदलले पाहण्यास मिळेल, अशा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
1 बुथसाठी 25 युथ (तरुण) -
राज्यातील 48 लोकसभा मतदार संघ आणि 288 विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या निमित्ताने पुर्वतयारी केली जात आहे. त्यानुसार 1 बुथ 25 युथ याप्रकारे नेमणुका करुन कार्याचे वाटप केले जात आहे.
राम मंदिर हा निवडणुकांचा मुद्दाच होऊ शकत नाही -
राम मंदिराबाबत शिवसेनेने घेतलेली भूमिका हे त्यांच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र, राम मंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्‍न असून त्याकरिता सरकार योग्य भूमिका घेत आहे. या मुद्द्यावरुन मतदारांचे मतपरिवर्तन होईल, असे काही नाही. शिवाय समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढवण्याचा पक्षाचा मानस असल्याचेही यावेळी दानवे यांनी स्पष्ट केले.
खासदार सुनील गायकवाड यांना कोपरखळ्या -
सुनील गायकवाड यांचे कार्य चांगलेच असल्याने ते आज लोकप्रतिनिधी आहेत. दुसरयांचे काही माहित नाही. परंतु, मला त्यांचे काम माहित असल्याचे सांगून दानवे यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली. यावेळी खासदार गायकवाड निशब्द झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप पक्षातूनच खासदार गायकवाड यांना कामाबद्दल घरचा आहेर मिळाला आहे.

No comments

Thank you for your feedback.