Header Ads

ad

मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई, आंदोलकांची धरपकड सुरू

कोल्हापूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मराठा आरक्षणासंदर्भात व मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात 26 नोव्हेंबरला विधानभवनावर मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात सरकारने मराठा समाजाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. शहरातील 10 कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरक्षण व विविध मागण्यांसाठी मराठा समाज 26 नोव्हेंबरला मुंबई येथे विधानभवनावर धडकणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी 16-26 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात मराठा संवाद यात्रा सुरू आहे. त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत असल्याचे सांगत पोलिसांनी ही धरपकड सुरू केली आहे. शहरातील दिलीप देसाई, वसंतराव मुळीक इंद्रजित सावंत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर आंदोलकांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

No comments

Thank you for your feedback.