Header Ads

ad

राज ठाकरेंची व्यंगचित्रातून भाजप, शिवसेनेवर टीका

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सध्या देशभरात राममंदिराच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि विश्‍व हिंदु परिषदेवर टीका केली आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की, लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते राममंदिर नव्हे!
देशभरात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चिला जाऊ लागला आहे. आता यावरूनच या सर्वांवर राज ठाकरे यांनी निषाणा साधला आहे. आपल्या व्यंगचित्रामध्ये राज यांनी भाजप, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषदेचे नेते लोकांना ’चलो अयोध्या’ असे आवाहन करत असल्याचे दाखवले आहे. तर त्यांच्या पुढे प्रभू रामचंद्र बसलेले दाखवण्यात आले आहेत. या सर्वांना उद्देशून प्रभू रामचंद्र म्हणत आहेत की, अहो, ’देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नव्हे. अशा प्रकारचा आशय व्यंगचित्रामध्ये लिहण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक अयोध्येला गेले आहेत. राम मंदिर बांधलं नाही तर पुढे मंदिर बनेल, पण हे सरकार नाही बनणार, असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला अयोध्येतून दिला आहे.

No comments

Thank you for your feedback.