Header Ads

ad

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई, 10 मराठा कार्यकर्त्यांना अटक

कोल्हापूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
कोल्हापूरमध्ये 10 मराठा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी ही अटक केली आहे. उद्या मुंबईत मराठा समाजाची संवाद यात्रा धडकणार होती. त्यासाठी शेकडो शेकडो गाड्या मुंबईत दाखल होणार होत्या.
प्रतिबंधात्मक कारवाई दाखवून पोलिसांनी 10 मराठा कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. यात दिलीप देसाई, इंद्रजित सावंत यांनादेखील अटक करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, मागासवर्ग अहवालात मराठा कुणबी हे वेगळे आहेत. मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा बोलबाला सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाने मात्र मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आरक्षण ओबीसी प्रवर्गातून द्या अशी भूमिका घेतल्याने आरक्षण मार्ग सुकर नाही हे दिसू लागलं आहे.
तर पुण्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.
भुसावळमध्ये 26 नोव्हेंबरला मराठा क्रांती संवाद यात्रा सकाळी नऊ वाजता बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळून जळगावकडे निघणार आहे. तर औरंगाबादमध्ये आजपासून मराठा क्रांती मोर्चाची संवाद यात्रा सुरू झाली आहे.
ही यात्रा गावागावात जाऊन मराठा समाजाची जागृती करणार आहे. आरक्षणाचा विषयही समाजाला समजावून सांगितला जाणार आहे. सरकारने आतापर्यंत काय केलं आणि पुढे काय हवंय या विषयी समाजासमोर माहिती दिली जाणार आहे.
तर उद्या अनेक ठिकाणांहून मराठा कार्यकर्ते संवाद यात्रेसाठी मुंबईत दाखल होणार आहेत.

No comments

Thank you for your feedback.