Header Ads

ad

कोल्हापूर पन्हाळा रोडवर टायर फुटल्याने तवेरा गाडी थेट डोहात; 5 ठार, 2 गंभीर

कोल्हापूर 24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
पन्हाळा रोडवर शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तवेरा कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात 3 वर्षीय बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध पोलिसांनी घेतला आहे. कारचा मागील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाला अशी, माहिती पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी दिली.
अश्‍विनी सुनील तांदळे (वय 26), अनिषा सुनील तांदळे (वय 14), धनश्री शशिकांत माने (वय 7), जान्हवी सुनील तांदळे (वय 7), बेबी सुनील तांदळे (वय 3, सर्व रा. दत्त कॉलनी मालगाव रोड मिरज) अशी मृतांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (वय 5),ओम सुनील तांदळे (वय 5) हे गंभीर जखमी असून यांच्यावर सीपीआर येथे उपचार सुरू आहेत.
मिरजेतील दत्त कॉलनीमधील रहिवाशी तवेरा (एमएच 15 ईबी 4340) कारने चालकासह एकूण 16 जण प्रवास करत होते. ते सर्वजण गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन परतत होते. तेव्हा कारच्या मागील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने कार रेडे डोह येथे जलपर्णी असलेल्या पाण्यात बुडाली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. तर, दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments

Thank you for your feedback.