Header Ads

ad

मुंबईसह राज्यभरात महाआरती; शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

मुंबई 24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
’हर हिंदू की यही पुकार पहेले मंदिर फिर सरकार’चा नारा देत शिवसेनेने अयोध्याकडे कूच केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अयोध्येतील नया घाट येथे शरयू आरती होणार आहे. अयोध्येत आरती सुरू होताच मुंबईसह राज्यातील मंदिरांमध्येही महाआरतीचा घंटानाद दुमदुमणार आहे. याची जबाबदारी युवासेना आणि महिला आघाडीला देण्यात आली असून अनेक मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येत उद्धव तर मुंबईत कार्यकर्ते राम मंदिरचा मुद्दा तापणावर आहे. याची जबाबदारी युवासेना व महिला आघाडीच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यात 350 तालुक्यांच्या ठिकाणी आणि मुंबईतील 8 लोकसभा क्षेत्रातील मंदिरात ही महाआरती होणार आहे. या आरतीच्या माध्यमातून शिवसेना आगामी निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन करणार आहे. शिवसेनेच्या शाखेतून रॅलीनंतर ठरलेल्या ठिकाणी कार्यकर्ते आरतीसाठी जमा होणार आहेत. युवासेना भोईवाडा ते वडाळा राम मंदिरपर्यंत बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार आहे.
मुंबईत ’या’ ठिकाणी होणार आरती -
मुंबईत आज सायंकाळी 5 वाजता विठ्ठल मंदिर - दहिसर (प.) स्टेशनजवळ, मुलुंड (प.) मारुती मंदिर, मानखुर्द शिवाजीनगर-गणेश मैदान-शाखा क्र. 26-धारावी, कुर्ल्यातील जागृत विनायक गणेश मंदिर, वडाळा, माहीम, प्रभादेवी-सिद्धिविनायक मंदिर-वरळी डाऊन मिल समोर, लोअर परळ, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा-श्रीराम मंदिर, झावबावाडी-ठाकूरद्वार येथे आरती होणार आहे.

No comments

Thank you for your feedback.