Header Ads

ad

नवस पूर्ण झाल्याने शिर्डीच्या साईचरणी भक्ताकडून 9 लाखांचा हार अर्पण

शिर्डी,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक श्रद्धेपोटी काहीना काही अर्पण करतात. आता अहमदाबाद येथील एका भाविकांने तब्बल 300 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला आहे.
शिर्डी साईबाबांना आम्ही एक नवस केला होता आणि साईबाबांनी आमचा नवस पूर्ण केल्याने आम्ही साईबाबांना 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. तसेच त्याची किंमत 9 लाख रुपये असल्याचे भाविकाकडून सांगण्यात आले आहे. या भाविकाची इच्छा होती, की आपण बाबांना दिलेले दान हे गुप्त दान म्हणून द्यावे यामुळे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवले आहे.
अहमदाबाद येथील एका दुकानात हा सुवर्ण हार बनवण्यात आला आहे. अतिशय सुंदर आणि नक्षीमय कारागिरी या हाराला करण्यात आली आहे. साईबाबांना सुवर्ण हार अर्पण करणार्‍या साई भक्त परिवाराचा साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी साई मूर्ती तसेच शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले आहे. साईबाबांच्या सायंकाळी होणार्‍या धुप आरतीच्या नंतर या साई भक्त परिवाराने हा सुवर्ण हार अर्पण केला असून साई संस्थानच्यावतीने हा हार साईबाबांच्या गळ्यात घालण्यात आला आहे.

No comments

Thank you for your feedback.