Header Ads

ad

रत्नागिरीच्या महाआरतीत घडले सर्वधर्म समभावाचे दर्शन

रत्नागिरी,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याच्या पाश्‍वभूमीवर शहरातील प्रसिद्ध राम मंदिरात शनिवारी शिवसैनिकांच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या रशीदा गोदड या मुस्लीम नगरसेविकेनेसुद्धा महाआरतीत सहभाग घेतला होता.
अयोध्येयत राम मंदिराचे निर्माण व्हावे यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौर्‍यावर गेले होते. त्यांचा हा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरात शिवसेनेच्यावतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील राम मंदिरातही शिवसैनिकांच्यावतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही महाआरती इतर महाआरत्यांपेक्षा अनोखी ठरली. कारण, या महाआरतीत सर्वधर्मसमभावाची भावना पहायला मिळाली.
रत्नागिरीतील शिवसेनेच्या मुस्लीम नगरसेविका रशीदा गोडस यांनी सुद्धा राम मंदिरात हजेरी लावत महाआरतीत सहभाग घेतला होता. टाळ आणि मृदुंगाच्या तालावर जवळपास एक तास ही महाआरती चालली होती.

No comments

Thank you for your feedback.