Header Ads

ad

मुंबईत संविधान बचाव रॅलीचा हुंकार, 14 संघटना एकवटल्या

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेत असताना आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला असताना यामध्ये डाव्या संघटनाही मागे नाहीत. मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ’संविधान बचाव रॅली’ निघाली आहे. या रॅलीत देशभरातील युवा संघटना सहभागी आहेत.
वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या 14 प्रमुख युवा संघटना एकवटल्या आहेत. यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या या रॅलीला दुपारी एक वाजता सुरुवात झाली.या ’संविधान बचाओ रॅली’मध्ये 14 युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यामध्ये आहेत.
काँग्रेससह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर आणि काँग्रेसचे युवा नेते सहभागी आहेत.

No comments

Thank you for your feedback.